शिक्षण हे साध्य नसून समाधान !

  • भूषण शिंदे & मुंबई लाइव्ह टीम
  • शिक्षण

मुलुंड - असं म्हणतात की शिक्षणासाठी वयाला असं काही महत्त्व नसतं. हे मुलुंडमध्ये राहणारे शरीफ खान यांनी दहावीची परीक्षा देऊन सिद्ध करून दाखवलं आहे. वयाच्या 41 वर्षी ते ही परीक्षा देत आहेत. यंदा त्यांची मुलगी रुकसान ही देखील बारावीची परीक्षा देत आहे. पण स्वत:चा अभ्यास करता-करता तिने वडिलांची देखील उजळणी घेतली. तर कधीकधी शरीफ हे दुपारच्या रिकाम्या वेळेत रिक्षातच आपला अभ्यास करतात.

शरीफ यांना शिक्षणाची आवड असूनही परिस्थितीमुळे दहावी करता आली नाही. पण आता दिवसभर रिक्षा चालवून आपल्या संसाराचा गाडा ओढता-ओढता अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. त्यामुळे शिक्षण हे साध्य नसून समाधान आहे हेच शरीफ यांनी दाखवून दिलंय.

पुढील बातमी
इतर बातम्या