डिझास्टर मॅनेजमेंट @ वझे कॉलेज

  • भूषण शिंदे & मुंबई लाइव्ह टीम
  • शिक्षण

मुलुंड - कुठेही आग लागल्यास अग्निशमन दल ताबडतोब पोहोचतेच. पण त्यापूर्वी नेमकं काय केलं पाहिजे. हा प्रश्न तुम्हालाही कधीतरी पडला असेल. नुकताच व्हीजे वझे महाविद्यालयात याच संदर्भात विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं. या वेळी पेडल, कटर, तसंच फायर एक्सटिन्जर या सामग्री कशा वापरायच्या याचंही प्रात्यक्षिकं मुलांना करून दाखवलं गेलं.

या कार्यक्रमाचं संपूर्ण नियोजन वझे महाविद्यालयातील एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी केंलं होतं. असे उपक्रम प्रत्येक महाविद्यालयांनी राबवल्यास नक्कीच आपात्कालीन परिस्थितीत मदत होईल यात शंकाच नाही.

पुढील बातमी
इतर बातम्या