अकरावीची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर

काही दिवसांपूर्वी तांत्रिक बिघडामुळे पुढे ढकलेली अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेची दुसरी गुणवत्ता यादी गुरुवारी १९ जुलैला जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी ही यादी १६ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार होती. मात्र अल्पसंख्याक महाविद्यालयातील कोट्यावरून नागपूर उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयामुळे ही यादी पुढे ढकलण्यात आल्यची माहिती सूत्रांनी दिली.

इतके विद्यार्थी पात्र

अकरावीच्या दुसऱ्या फेरीसाठी ऑनलाइन जागा, इन हाऊस आणि मॅनेजमेंट कोट्यासह एकूण २ लाख १२ हजार ५९३ जागा शिल्लक आहेत. त्यासाठी अर्ज केलेल्या २ लाख ३ हजार १२० विद्यार्थ्यांपैकी अकरावीच्या दुसऱ्या फेरीसाठी १ लाख ५२ हजार १९४ विद्यार्थी पात्र ठरले आहेत.

नामांकित कॉलेजचा कटऑफ

मीठीबाई कॉलेजमधील कला शाखेचा कटऑफ ८९.६ टक्के असून वाणिज्य शाखा ८६ टक्के इतका आहे. तर सायन्स शाखेची दुसरी यादी ६७.६ टक्के एवढ्यावर बंद झाली.

दरम्यान बुधवारी एफवाय प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादीही जाहीर करण्यात आली असून यंदा तिसऱ्या यादीचा कटआॅफही नव्वदी पार असल्याचं चित्र पाहायला मिळालं.

अनेक नामांकित कॉलेजचा कटऑफ ९० ते ९२ टक्के असल्यानं ७० ते ७५ टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची चांगलीच पंचायत झालेली पाहायला मिळत आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या