अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत पुन्हा गोंधळ, तिसरी यादी पुढे ढकलली

अल्पसंख्याक कॉलेजांमधील इनहाऊस कोट्यातील जागा केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट कराव्यात, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठान बुधवारी दिला. त्यामुळ या जागांसाठी प्रवेश देण्याकरता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची गुरुवारी जाहीर होणारी यादी जवळपास चार ते पाच दिवस पुढे ढकलण्यात आली आहे.

म्हणून यादी पुढे ढकलली

मुंबईतील अल्पसंख्याक ज्युनिअर कॉलेज, उच्च माध्यमिक विद्यालयांना अल्पसंख्याक, इनहाऊस, व्यवस्थापन कोट्यातील केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट केलेल्या सर्व जागा परत करण्याचे आदेश गेल्या आठवड्यात नागपूर खंडपीठानं दिले होते. याच याचिकेवर बुधवारी सुनावणी करण्यात आली. त्यावेळी या तीन कोट्यांपैकी केवळ इनहाऊस कोट्यातील जागा पुन्हा समाविष्ट करण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे. त्यामुळे अकरावीची तिसरी यादी चार-पाच दिवस पुढे ढकलली आहे.

वेळापत्रकात हा तीसरा बदल

मुंबईतील अल्पसंख्याक महाविद्यालयांत अशा सुमारे १२ हजार जागा असून या जागांवर प्रवेश देण्यासाठी गुरुवारी जाहीर होणारी तिसरी यादी पुन्हा पुढे ढकलली आहे. आत्तापर्यंत विविध कारणांमुळे अकरावी प्रवेशाच्या वेळापत्रकात हा तीसरा बदल करण्यात आला आहे. याबरोबरच इनहाऊस कोट्यातील जागा पुन्हा केंद्रीभूत प्रक्रियेत समाविष्ट करण्याच्या निर्णयामुळ नवीन सुधारीत वेळापत्रक आज, गुरुवारी जाहीर करण्यात येणार असल्याचं शिक्षण विभागाने स्पष्ट केलं आहे.

यादी कधी होणार जाहीर?

आता कॉलेजांना अल्पसंख्याक कोट्यातील इनहाऊस कोट्यातील जागा समाविष्ट करण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली जाईल. त्यानंतर या जागांवर अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी दोन दिवस दिले जाणार आहे. त्यानंतर तिसरी गुणवत्ता यादी जाहीर होईल. यासर्व प्रक्रियेला चार ते पाच दिवस जाणार आहेत. त्यामुळे ही यादी पुढच्या आठवढयात जाहीर होण्याची शक्यता आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या