एफवायच्या प्रवेशपूर्व नोंदणीला सुरूवात

बारावीचे निकाल लागल्यानंतर गुरुवारपासून एफवायच्या प्रवेशपूर्व नोंदणीला सुरुवात झाली आहे. यावर्षी नवीन कंपनीकडे हे कंत्राट देण्यात आले आहे. दरवर्षी ऑनलाईन नोंदणीमध्ये काही ना काही गोंधळ होतो, त्यामुळे यावर्षी हे काम नवीन कंपनीकडे देण्यात आल्यामुळे, सगळ्यांचेच लक्ष ऑनलाईन नोंदणीकडे लागले होते. पहिल्या दिवशी 19 हजार 514 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेशपूर्व नोंदणी केली. विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया दिलेल्या वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी विद्यापीठाने mum.digitaluniversity.ac ही वेबसाईट सुरू केली आहे. यावर्षीची प्रक्रिया ही कोणताही गोंधळ न होता पार पडली.

या ऑनलाईन प्रवेशपूर्व नोंदणीसाठी 20 हजार 497 विद्यार्थ्यांनी वेबसाईटला भेट दिली. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची शंका असल्यास त्यांनी 9326552525 या क्रमांकावर संपर्क साधावा अशी माहिती विद्यापीठातील जनसंपर्क विभागाचे उपकुलसचिव लीलाधर बनसोडे यांनी दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या