दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता मार्गदर्शन शिबिर

चेंबूर - जीवनज्योत फाउंडेशनच्या वतीने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनानिमित्त मंगळवारी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर घेण्यात आलं. चेंबूर येथील एन. जी आचार्य आणि डी. के. मराठे महाविद्यालयात हे शिबीर झालं. या कार्यक्रमाला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचीही उपस्थिती होती. मुलांनी परिक्षेला घाबरून जाण्याची गरज नाही. आयुष्यात अनेक पर्याय उपलब्ध असतात, दहावी परीक्षेत नापास झालात तर तुम्हाला परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यातही नापास झालात तर त्या विद्यार्थ्याचा कल पाहून स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून कोर्स देण्यात येईल. याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल असं तावडे यांनी या वेळी विद्यार्थ्यांना सांगितलं. या कार्यक्रमाला रमेश म्हापणकर, अनिल चौहान, सुबोध आचार्य, एम, एन राममूर्ती, नगरसेवक महादेव शिगवण, डॉ. श्रीनिवास शुक्ला आदीही उपस्थित होते.

पुढील बातमी
इतर बातम्या