परीक्षेचं टेन्शन आलंय? नो प्रॉब्लेम..हे वाचा!

हल्ली मुलांना आणि विशेषत: त्यांच्या आई-वडिलांना 'आपली मुलं परीक्षेत अव्वल यावीत' असं वाटत असतं. त्यामुळे रात्र-रात्र जागून मुलांचा अभ्यास घेतला जातो. आपली क्षमता विसरुन ही मुलं अभ्यास करायला लागतात. पण, अशामुळे दहावी-बारावी किंवा अन्य परीक्षा देणाऱ्या मुलांवर प्रचंड मानसिक ताण येतो.

प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर गेल्यावर तर या मुलांवरचा ताण आणखीनच वाढतो. या तणावाचा परिणाम म्हणजे अनेक विद्यार्थ्यांना ऐन परीक्षेत प्रश्नपत्रिका पाहिल्यावर गरगरल्यासारखं होतं, चक्कर येते. पण, अशा परिस्थितीत मुलांनी आपलं टेन्शन कसं कमी केलं पाहिजे? याबाबत 'मुंबई लाइव्ह'ने मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर कारिया यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी परीक्षा काळात किंवा त्यादरम्यान काय करावं? आणि काय करु नये? याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं.

अभ्यास करण्याआधी मन एकाग्र करा

जितकं जमेल तितकंच वाचा

पोट भरेल एवढं खा. भूक कमी असल्यास फळांचे रस प्या

खाण्यात जास्त तेलकट, तुपकट नको. ज्यामुळे अॅसिडिटीचा त्रास होणार नाही

परीक्षेच्या दरम्यान मोबाईलपासून दूर राहा

भरपूर पाणी प्या, तसंच फळं आणि भाज्याही खा

झोप येऊ नये, म्हणून चहा किंवा कॉफीचं अतिसेवन नको

परीक्षेच्या आदल्या रात्री थोडं लवकर झोपून पुरेशी झोप घ्या

प्रत्येक ओळ लक्षात ठेवण्याचा आग्रह धरू नका

नातेवाईकांचे फोन घेणं टाळा

शेवटच्या मिनिटापर्यंत रिव्हिजन करू नका

सोशल नेटवर्किंग साईटपासून दूर राहा

परीक्षेसाठी घरातून थोडं लवकर निघा. अशावेळी गाडी स्वतः चालवू नका

परीक्षेपूर्वी थोडावेळ आधी दीर्घ श्वास घ्या

परीक्षेदरम्यान जर ब्लँक झालात, तर दीर्घ श्वास घ्या. थोडावेळ शांत व्हा

पेपर झाल्यानंतर त्यावर चर्चा करू नका

घरी गेल्यानंतर पुढच्या पेपरच्या विषयाचा अभ्यास सुरू करा

जास्तवेळ टीव्ही पाहणं टाळा

टेन्शन आलं तर रिलॅक्स होण्यासाठी थोडा व्यायाम करा किंवा गाणी ऐका

मूड उत्तम राहण्यासाठी इतरांशी विनोदी गप्पा मारा

जेवणादरम्यान अभ्यासाचा विषय टाळा

परीक्षा सुरु असताना दिवसभरात ३० मिनिटं खेळा. पण, दुखापत होणार नाही याची काळजी घ्या

शेवटचं आणि महत्त्वाचं..पालकांनी आपल्या मुलांची तुलना करु नये. त्याचा मानसिक ताण मुलांवर येऊ शकतो

पुढील बातमी
इतर बातम्या