यंदा १२ वीचा निकाल १० जूनला नाही लागणार, विद्यार्थ्यांना पहावी लागणार वाट

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या १२वी पेपरचा निकाल दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहिर करण्यात येतो. परंतु यंदा कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर १२ चे पेपर झाले तरी त्यांच्या निकालाबाबत प्रश्न चिन्ह आहे. काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १२ परीक्षेचा निकाल १० जूनपर्यंत जाहिर करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. परंतु, १२ निकाला जाहिर होणं अशक्य असल्याची माहिती समोर येतं आहे.

राज्यात लॉकडाऊन लागू होण्यापूर्वी १२वी च्या परीक्षा पार पडल्या होत्या. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर निकालाबाबत कोणतीही चर्चा नव्हती. परंतु विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जावू नये यासाठी निकाल जाहिर करण्याकरीता उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मुंबई लाइवशी बोलताना पेपरचं मुल्यांकन करुन लवकरच निकाल जाहीर करण्यात येतील. लॉकडाऊनमुळं पेपर तपासणीला उशीर झाला. दरम्यान, उत्तरपत्रिका पोस्टाद्वारे मूल्यांकनाच्या केंद्रात पाठविण्यात आले आहेत. तसंच, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत निकाल जाहीर करण्याकडे लक्ष आहे.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा व कॉलेजच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणं, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द केल्याची घोषणा केली.

पुढील बातमी
इतर बातम्या