मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता युवा अॅपद्वारे अॅडमिशन, परिक्षा, निकालाची माहिती मिळणार आहे. 14 मार्चपासून हे अॅप सुरू करण्यात आलंय. तब्बल सव्वालाख विद्यार्थ्यांना याचा फायदा हेणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना चौकशीसाठी आता फेऱ्या मारण्याची आवश्यकता नाही.
विद्यार्थ्यांना प्लेस्टोअरवरून ‘युवा आयडॉल’ अॅप डाऊनलोड करावे लागेल. या अॅपद्वारे प्रवेश, निकाल, परिक्षा, विविध घडामोडी विद्यार्थ्यांना लगेच समजतील.