आशियातील क्रमवारीत आयआयटीची 33 व्या स्थानावर झेप

पवई येथील आयआयटी मुंबईने जोरदार प्रगती करत आशियातील विद्यापीठांच्या रँकमध्ये आगेकूच केली आहे. उच्च शिक्षण देणाऱ्या आशिया खंडातील संस्थांची क्रमवारी नुकतीच जाहीर करण्यात आली. यामध्ये तंत्रशिक्षण देणाऱ्या आयआयटी मुंबईने आशिया खंडात 33 व्या स्थानावर झेप घेतली आहे. तर यामध्ये देशातील 8 विद्यापीठांनी टॉप शंभरच्या यादीत स्थान मिळवलं आहे.

पातळी आणखी वाढवण्याची गरज 

बुधवारी क्वायकरेली सायमंड्स (क्यूएस) या आंतरराष्ट्रीय संस्थेने भारतीय विद्यापीठांची क्रमवारी जाहीर केली. क्यूएसचे संशोधन प्रमुख बेन सोटर यांनी भारतीय शिक्षणसंस्थांमधील संशोधनाबाबतची आस्था वाढत चालली असली तरी त्याची पातळी आणखी वाढवण्याची गरज आहे. त्यासाठी भारतीय शिक्षणसंस्थांनी स्थानिकच नव्हे तर आंतरराष्ट्रीय संस्थांचं सहकार्य घेणे फायद्याचं ठरेल, शिवाय भारतीय उच्च शिक्षण संस्थांसाठी ही उत्तम प्रदर्शनाची संधी आहे, असं मत नोंदवलं.

टॉप शंभरची यादी जाहीर

यावेळी टॉप शंभर विद्यापीठांची क्रमवारीही जाहीर करण्यात आली, ज्यात आठ भारतीय विद्यापीठांचा समावेष करण्यात आलं. तर या क्रमवारीत नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरने प्रथम, विद्यापीठ ऑफ हाँगकांगने दुसरा आणि नुनयग टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटीने तिसरा क्रमांक पटकावला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या