आयआयटी मुंबईच्या ‘मूड इंडिगो’चं ५० वे वर्ष; ऑनलाईन होणार साजरा

देशातील प्रसिद्ध कॉलेज फेस्टिव्हल म्हणून ओळख असलेल्या आयआयटी मुंबईचा ‘मूड इंडिगो’चे यंदाचे ५० वे वर्ष आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे सुवर्ण महोत्सवी वर्ष ऑनलाईन साजरा करण्याचा निर्णय आयआयटी मुंबईतर्फे घेण्यात आला आहे. ‘एक सुनेहरा कारवाँ’ या लोकल थीमवर यंदा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

येत्या २६ व २७ डिसेंबरला मूड इंडिगो ऑनलाईन होणार आहे. ‘मूड इंडिगो’चे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने ते आजी-माजी सर्वच विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे असणार आहे. दरवर्षी मूड इंडिगोमध्ये जगभरातील ४० पेक्षा जास्त देशांतील कलाकार आणि भारतातील १ लाख ४६ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी होतात.

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे मूड इंडिगो ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे हा कार्यक्रम अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी मूड इंडिगोची टीम काम करत आहे. आतापर्यंत त्यांना १ लाख लोकांपर्यंत पोहचता आले आहे. मूड इंडिगो हे नेहमीच ट्रेंड सेटर राहिले आहे.

भारतामध्ये सुमो पैलवानांना मूड इंडिगोमध्ये आणण्यात आले होते. दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवरांना मूड इंडिगोमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आणण्यात येते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवरांना कार्यक्रमात आणण्याचा मूड इंडिगोच्या टीमने एक प्रकारे विक्रमच केला असून, त्याची नोंद गिनेज बूकमध्ये करण्यात आली आहे. मूड इंडिगोमध्ये दीपिका पदूकोण, आमिर खान, देवेंद्र फडणवीस, देवदत्त पटनाईक, झाकीर खान आणि बिस्व कल्याण रथ आदी मंडळी सहभागी झाली आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या