जागतिक पुस्तक दिन विशेष: जाणून घ्या वाचनाचं महत्त्व

इंटरनेट, मोबाइलच्या या जमान्यात नव्या पिढीने पुस्तकांकडे जणू पाठच फिरवली आहे. सध्या मोबाइलवर अनेक अॅप उपलब्ध आहेत इंटरनेटवर कोणत्याही शब्दाचा अर्थ चटकन मिळतो. अनेकदा या तरुण पिढीला पुस्तक वाचणं बोअरिंग वाटतं. इंटरनेटवर कोणतीही माहिती मिळून जाते ना मग पुस्तक का वाचायचं असं सध्याच्या पिढीला वाटतं. त्यामुळे सध्या पुस्तक वाचण्याकडे तरुणांचा कल कमी झाला आहे. जो तो मोबइलमध्ये बिझी झाला आहे. आपण जशा इतर गोष्टींची सवय लावतो, त्याप्रमाणे पुस्तक वाचनाचीही सवय लावली तर त्यात कुठे नुकसान आहे.

खरंतर जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने केलेला हा सगळा उहापोह. २३ एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन. याच दिवशी जगप्रसिद्ध साहित्यिक शेक्सपिअर यांचा जन्म आणि मृत्यू दिन. याच दिवसाला पुस्तक दिन म्हटलं जातं.

वाचनाचं महत्त्व?

वाचन हा एक संवाद आहे. लहान मुलांनी पुस्तकांचं वाचन हे मोठ्यानेच करायला हवं. यामुळे शब्दांच्या उच्चाराला धार येते आणि वेग वाढतो. त्यातून मग एखादा प्रसंग झाला की त्यावर चर्चा होते. त्यामुळे वाचलेलं मनात पेरले जातं आणि ते चांगलं लक्षात राहातं. पुस्तकांव्यतिरिक्त जी इतर माध्यमं आहेत ती खत-पाणी म्हणून वापरावी.

मराठीतील प्रसिद्ध लेखक आणि त्यांची पुस्तकं

  • पुल देशपांडे - बटाट्याची चाळ, व्यक्ती आणि वल्ली

  • साने गुरुजी - श्यामची आई

  • वि. स. खांडेकर - हिरवा चाफा, अमृतवेल, कोंचवध, ययाती

  • वि वा शिरवाडकर - नटसम्राट, आहे आणि नाही

  • विश्वास पाटील - झाडाझडती

  • वि ग कानिटकर - नाझी भस्मासुराचा उदयास्त

  • शिवाजी सावंत - युगंधर, छावा

  • शिव खेरा, यश तुमच्या हातात

  • भालचंद्र नेमाडे, कोसला

  • श्याम मराठे, यशाची गुरुकिल्ली, अभ्यासाची सोपी तंत्रे, मनोरंजक शून्य

  • प्रल्हाद केशव अत्रे (प्र के अत्रे) - डॉ. लागू, झेंडूची फुले, कर्‍हेचे पाणी, तो मी नव्हेच

  • वसंत पुरुषोत्तम काळे (व. पु. काळे) - गुलमोहर, काही काही खोटं, घर हलवलेली माणसं, तप्तपदी

  • चिंतामण त्र्यंबक खानोलकर (आरती प्रभू) - एक शून्य बाजीराव (नाटक), कालाय तस्मै नमः (नाटक), कोंडुरा (कादंबरी)

  • विवा शिरवाडकर (कुसुमाग्रज) - फक्त लढ म्हणा (कविता), जीवनलहरी, किनारा, महावृक्ष

  • राम गणेश गडकरी (गोविंदाग्रज) - एकच प्याला, प्रेमसन्यास, भावबंधन, वेड्याचा बाजार

  • वीणा गवाणकर - एक होता कारवर

तुमचे शब्दसंग्रह आणि ज्ञानात भर पाडायचं असेल तर चला तर मग आजपासून का होईना पुस्तकांच्या वाचनाला जरुर सुरुवात करा. आणि हो खत पाणी म्हणून इतर माध्यमांचाही वापर करा.

पुढील बातमी
इतर बातम्या