दहावीत शिकवणाऱ्या शिक्षकांची माहिती आता ऑनलाईन

दहावीत शिकवणाऱ्या सर्व विषयांच्या शिक्षकांची माहिती ऑनलाइन सादर करण्याचे आदेश नुकतंच राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं काढले आहेत. सरलमधील माहिती उपलब्ध असतानाही आता ही नव्यानं माहिती भरण्याचा व्याप का? असा प्रश्न शाळांकडून विचारला जात आहे.

दहावीला शिकवणारे शिक्षक कोण आहेत, त्यांचे शिक्षण, अनुभव याचबरोबर उत्तरपत्रिकांचं मूल्यांकन कोण करणार या सर्व बाबींचा तपशील एकत्रित यावा, या उद्देशानं मंडळाने हा तपशील मागविला आहे. दरवर्षी शाळा हा तपशील मंडळाकडे सादर करते.

शाळांना तपशील पाठवण्याचे आदेश

शाळांचा सर्व तपशील असलेल्या 'सरल' या प्रणालीमध्ये माहिती उपलब्ध झाल्यापासून हा तपशील मागवण्यात येत नव्हता. मात्र यंदाच्या वर्षीपासून शाळांना हा तपशील पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच या आदेशात हा तपशील बिनचूक असावा असंही नमूद करण्यात आलं आहे. त्याशिवाय शिक्षण मंडळ शाळांनी पाठवलेली माहिती 'सरल'च्या माहितीसोबत तपासून घेणार असल्यानं मंडळाच्या या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त होत आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या