सोमय्या कॉलेजमध्ये इस्रोचे प्रदर्शन

विद्याविहार - के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोच्या वतीने अभियांत्रिकी २०१६ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्याविहार येथील सोमय्या कॉलेजमध्ये अंतराळ मोहिमेसंदर्भात विविध साधन-सामुग्रीचे प्रदर्शन भरवण्यात आले. यामध्ये पीएसएलव्ही लाँचर, मंगळ ग्रहावरील अनुभव डोळ्याने घेता यावा म्हणून बनवलेले थ्रीडी इफेक्ट मशीन, पृथ्वी आणि ग्रह यांची स्थिती दर्शवणारी प्रतिकृती, अनेक उपग्रहांच्या प्रतिकृती, ग्रहांची आणि ग्रहमालेची माहिती देणाऱ्या यंत्रणांचाही यामध्ये समावेश होता. ३० सप्टेंबरला एस. एम. वैद्य उपाध्यक्ष गोदरेज एरो स्पेस यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. तर १ ऑक्टोबरला या प्रदर्शनाचा समारोप करण्यात आला. या दोन दिवसात तब्बल ५० शाळा आणि २० महाविद्यालयातल्या १५ हजार विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या