इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी होणारी JEE आणि मेडिकलच्या प्रवेशासाठी होणारी NEET या दोन्ही परीक्षांची तारीख दुसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयानं जुलै महिन्यात या परीक्षा घेण्याची घोषणा केली होती. परंतु कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने विद्यार्थ्याचा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून केंद्रिय मनुष्यबळ विकास मंत्रालयने या परीक्षा पुढं ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय मनुष्यबळ मंत्री रमेश पोखरियाल यांनी जुलैमध्ये दोन्ही परीक्षा घेण्याची घोषणा मे महिन्यात केली होती. एवढंच नाही, तर या परीक्षांचं वेळापत्रकही निश्चित करण्यात आलं होतं. परंतु कोरोनाच संकट कमी होण्याऐवजी वाढतच असल्याने पोखरियाल यांनी या परीक्षा २ महिन्यांनी पुढं ढकलण्याची घोषणा केला.
नव्या वेळापत्रकानुसार NEET २६ जुलै रोजी होणारी परीक्षा आता १३ सप्टेंबर होणार आहे. तर JEE मुख्य परीक्षा १८ ते २३ जुलैला होणार होती ती आता १ ते ६ सप्टेंबर आणि ॲडव्हान्स परीक्षा २७ सप्टेंबरला घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे या दोन्ही परीक्षांसाठी केंद्र बदलण्याची मुभा देखील विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. ४ जुलै ते १५ जुलैच्या दरम्यान विद्यार्थी त्यासाठी ऑनलाइन अर्ज करु शकतात, अशी माहिती देण्यात आली आहे.
इंजिनीअरींग, मेडिकल प्रवेशासाठी इच्छुक असलेले लाखो विद्यार्थी जेईई व नीट प्रवेश परीक्षा देत असतात. परंतु या परीक्षांच्या खासगी कोचिंग क्लासची फी परवडणारी नसल्यानं पैशांअभावी अनेक विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येत नाही. या सर्व विद्यार्थ्यांकरीता मोफत शिकवणी सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. सरकारच्या या निर्णयाचा फायदा बऱ्याच गरीब विद्यार्थ्यांना होणार आहे. काही दिवसांपूर्वी उच्च शिक्षण संस्थांमधील पदवी प्रवेशांच्या आयोजनासाठी केंद्र सरकारनं 'नॅशनल टेस्टिंग एजन्सी' स्थापन केली होती. या परीक्षा केंद्रांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवणी देण्यात येणार होती.
हेही वाचा- नीट’ आणि ‘जेईई-मेन्स’ परीक्षेच्या तारखा अखेर जाहीर