ऐन १२ वीच्या परीक्षांवेळी ज्युनियर कॉलेज राहणार बंद

येत्या २ फेब्रुवारीला राज्यातील सर्व ज्युनियर कॉलेज बंद राहतील, असा इशारा शिक्षकांनी दिला आहे. मागील ३ वर्षांपासून विविध मागण्यांसाठी शिक्षकांनी अनेकवेळा आंदोलनं केली. मात्र अश्वासनाखेरीज पदरात काहीच पडलेलं नाही, त्यामुळे 'ज्युनियर कॉलेज टीचर्स असोसिएशन'ने ही बंदची हाक दिली आहे.

मागच्या ३ वर्षांपासून सातत्याने मागण्या करूनही सरकारने मागण्यांची पूर्तता केलेली नाही. आधी मागण्या मान्य करा अन्यथा बारावी परीक्षेच्या तोंडावर २ फेब्रुवारीला राज्यातील सर्व ज्युनियर कॉलेज बंद राहतील, असा इशारा शिक्षकांनी दिला आहे. 'ज्युनियर कॉलेज असोसिएशन'च्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

'या' आहेत मागण्या

निवडश्रेणी आणि वेतनश्रेणीसाठी शाळेच्या ८० टक्के निकालाची अट काढून टाका

ज्युनियर कॉलेजचे प्रशासन स्वतंत्र करा

शिक्षणसेवक कालावधी संपलेल्या शिक्षकांना सेवासातत्य द्या

गणित व विज्ञानाचे भाग १ व २ असे स्वतंत्र पेपर करा

शिक्षकांच्या ४२ दिवसांच्या संपकालीन रजा पूर्ववत खात्यावर जमा करा

या आधी आम्ही १४ नोव्हेंबरला आंदोलन केलं होतं. त्यावेळी आम्हाला केवळ अश्वासन मिळालं. मात्र आंदोलनाला महिना होत आला, तरी अश्वासनांची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे आम्ही ज्युनियर कॉलेज असोसिएशनच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. यावेळी देखील सरकारने दखल घेतली नाही तर आम्ही आंदोलन आणखी तीव्र करू. २ फेब्रुवारीला होणाऱ्या आंदोलनात राज्यातील सर्व ज्युनिअर कॉलेज बंद राहतील. या आंदोलनात मुंबईतील ७०० शिक्षक सहभागी होणार आहेत.

– प्रा. अनिल देशमुख, ज्युनियर कॉलेज टीचर्स असोसिएशन

पुढील बातमी
इतर बातम्या