कुलगुरू पदासाठी अंतिम ५ नावे संध्याकाळपर्यंत राजभवनात दाखल होणार

  • मुंबई लाइव्ह टीम & नम्रता पाटील
  • शिक्षण

मुंबईसह राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंची घोषणा लवकरच करण्यात येईल. मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरू पदासाठी ३२ जणांच्या मुलाखती पार पडल्या. शनिवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे अंतिम ५ नावे पोहोचण्याची शक्यता आहे.

समितीपुढे मुलाखत पार पडल्या

मुलाखतीसाठी ३२ जणांना मुंबईतील नरिमन पॉइंट येथील सिडको कार्यालयात बोलवण्यात आलं होतं. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीपुढे मुलाखती पार पडल्या. लवकरच ही नावे राजभवनात पाठवण्यात येईल. त्यानंतर हे सर्वजण राज्यपालांसमोर विद्यापीठाच्या कामकाजाबाबत सादरीकरण करणार आहेत. आणि त्यानंतर राज्यपाल या सर्वांमधून नव्या कुलगुरूंची घोषणा करतील.

नवीन कुलगुरु कोण होणार?

मुंबई विद्यापीठाने गेल्या वर्षी घातलेल्या निकाल गोंधळामुळे राज्यपालांनी तत्कालीन कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना पदावरून दूर करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर विद्यापीठाची जबाबदारी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यावर प्रभारी कुलगुरू म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती. दरम्यान बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असलेल्या मुंबई विद्यापीठाची कुलगुरुंची माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या