दहावी आणि बारावी परिक्षांची तारीख जाहीर

महाराष्ट्र (maharashtra) राज्य मंडळाचे सचिव प्रमोद गोपाने यांनी सोमवारी एका अधिसूचनेत तारखा जाहीर केल्या.

बऱ्याच प्रतीक्षेनंतर, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 2026 च्या उच्च माध्यमिक (Hsc - इयत्ता 12 वी) आणि माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (Ssc - इयत्ता 10 वी) परीक्षांच्या (Exams) तारखा जाहीर केल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य मंडळाचे सचिव प्रमोद गोपाने यांनी सोमवारी एका अधिसूचनेत तारखा जाहीर केल्या.

एचएससीच्या लेखी परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत होणार आहेत. एचएससीच्या इतर मूल्यांकन परीक्षांसह प्रात्यक्षिक आणि तोंडी मूल्यांकन 23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2026 या कालावधीत होणार आहे.

एसएससी परीक्षांसाठी, लेखी परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत होतील, तर प्रात्यक्षिक आणि तोंडी मूल्यांकन 2 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी दरम्यान होतील.

महाराष्ट्र राज्य मंडळाने गेल्या वर्षी सुरू केलेली बारावी आणि दहावीच्या परीक्षा लवकर घेण्याची पद्धत सुरू ठेवली आहे. ज्याचा उद्देश पुढील शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेत विलंब होऊ नये म्हणून निकाल लवकर जाहीर करणे आहे.

गेल्या वर्षी पहिल्यांदाच दोन्ही परीक्षा फेब्रुवारीमध्ये सुरू झाल्या आणि निकाल लवकर जाहीर करण्यात आले, ज्यामुळे वेळेवर प्रवेश शक्य झाला. यावर्षी देखील दोन्ही परीक्षा फेब्रुवारीमध्ये सुरू होत आहेत.

सहसा बारावी आणि दहावीच्या परीक्षेच्या तारखा ऑगस्टमध्ये जाहीर केल्या जातात. तथापि, यावर्षी परीक्षेच्या तारखा जाहीर होण्यास उशिर झाला. ज्यामुळे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये चिंता निर्माण झाली होती.


हेही वाचा

दिवाळीनिमित्त पश्चिम रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय

म्हाडा 5 वर्षांत 7 लाख घरे बांधणार

पुढील बातमी
इतर बातम्या