महाराष्ट्र मेडिकल इंटर्न डॉक्टर संपावर ठाम

  • मुंबई लाइव्ह टीम & सोनाली मदने
  • शिक्षण

इतर राज्यांच्या तुलनेत आपल्याला खूपच कमी वेतन मिळत असून विद्यावेतनाच्या मागणीखातर महाराष्ट्रात मेडिकल इंटर्न अर्थात प्रशिक्षणार्थी डॉक्टर संपावर जाण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. येत्या १३ जून पासून विद्यार्थी संपावर जाणार आहेत.

महाराष्ट्रातील बहुतांश विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. वैद्यकीय शिक्षणात विद्यार्थ्यांना किमान एक सेमिस्टर इंटर्नशीप करावी लागते, अर्थात ही इंटर्नशीप "पेड इंटर्नशीप" असते. इंटर्नशीपमध्ये भारतात महाराष्ट्र सोडून बाकी सर्व राज्यात ११ हजारपेक्षा जास्त वेतन दिलं जाते. त्यामुळे विद्यावेतनाच्या मागणीखातर या विद्यार्थ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

बैठक निष्फळ

सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये विद्यावेतन वाढवून देण्याची मागणी पूर्ण होईल, अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा होती. मात्र राज्याच्या अर्थविभागाने यासंदर्भात कोणताही सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने हा निर्णय घेतल्याचे इंटर्न डॉक्टरांच्या संघटनेचे सचिव डॉ. असीफ पटेल यांनी स्पष्ट केलं.

राज्याच्या विविध वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये दोन हजारापेक्षा जास्त शिकावू डॉक्टर आहेत, गतवर्षापासून वेतनवाढीसाठी याचिका दिल्या जात होत्या. पण त्यातून काहीच निष्पन्न होत नाही. राज्यातील शिकाऊ डॉक्टरांना मिळणारे वेतन अत्यल्प आहे. हे वेतन वाढवण्याच्या मागणीसाठी सातत्याने विचारणा करूनही सरकारने त्यासंदर्भात गांभीर्याने विचार केलेला नाही.

पुढील बातमी
इतर बातम्या