महाराष्ट्रात मेडिकल शिक्षण मराठीतून, राज्य सरकारचा मोठा निर्णय

आता महाराष्ट्रातही मराठीतून वैद्यकीय शिक्षण (Marathi Medical Education) घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. याबाबतची मोठी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजान यांनी एका वृत्त चॅलनला दिली आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मराठी भाषेत वैद्यकीय शिक्षण घेणं सोपं होणार आहे. 2023 या शैक्षणिक वर्षापासून ही सुविधा उपलब्ध असेल.

पण वैद्यकीय शिक्षण मराठीत घेणे बंधनकारक नसेल. विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार, हवी ती भाषा निवडण्याची मुभा असेल.

आता एमबीबीएससह आयुर्वेद, होमिओपॅथी, दंतचिकित्सा, नर्सिंग, फिजिओथेरपी यांसारखे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना मराठीतून उपलब्ध करून दिले जाणार आहेत. 2023 च्या शैक्षणिक वर्षांपासून हे अभ्यासक्रम मराठीतून उपलब्ध होतील. विशेष म्हणजे मराठीतून वैद्यकीयचे शिक्षण घेणं बंधनकारक राहणार नाही, ते ऐच्छिक असेल.

मध्य प्रदेशनंतर आता महाराष्ट्रात राज्य भाषेत म्हणजेच मराठी भाषेत वैद्यकीय शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न असून सर्वच पॅथी, एमबीबीएस पर्यंतचा अभ्यासक्रम हा मराठीत देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं महाजन यांनी यावेळी सांगितलं आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या