विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी राज ठाकरेंनी उचलले हे पाऊल

हरियाणातील शाळेत झालेल्या लहान मुलाच्या हत्येनंतर मुलांचा सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. लहान मुलांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील सर्व सरकारी आणि शाळा, महाविद्यालयांना पत्र लिहिले आहे. शैक्षणिक संस्थेत घडणाऱ्या घटनांनी उद्विघ्न होऊन राज यांनी हे पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी मदतीची गरज भासल्यास थेट संपर्क करण्याचे आवाहनही केले आहे.

देशाचे भावी आधारस्तंभ असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबबात सरकार ठोस पावले उचलत नाहीत. असा गंभीर विषय सोडवण्यासाठी ठोस पावले उचल्याची गरज आहे, असे राज यांनी पत्रात म्हटले आहे.

महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुला-मुलींना मी माझ्या मुला- मुलींसारखा मानतो. त्याचप्रमाणे शाळा महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मानली तर विद्यार्थ्यांचे या शैक्षणिक क्षेत्रात कोणीही वाकडे करू शकत नाही, असे आवाहनही राज ठाकरे यांनी पत्राद्वारे केले आहे. त्याचप्रमाणे कोणतीही मदत लागल्यास माझ्याशी संपर्क साधा असे पत्राच्या शेवटी म्हटले आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या