एमपीएससी मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर

  • मुंबई लाइव्ह टीम & नम्रता पाटील
  • शिक्षण

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी)च्या मुख्य परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला आहे. या परिक्षेत जळगाव जिल्ह्यातील रोहितकुमार राजपूत या विद्यार्थ्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकवला आहे.

यासाठी घेतली जाते एमपीएससी परीक्षा

सप्टेंबर २०१७ मध्ये उपजिल्हाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, सेल टॅक्स आणि अशा एकूण ३७७ विभागातील अधिकारी पदासाठी ही परीक्षा घेतली जाते. त्यात रोहितकुमार राजपूत याने प्रथम क्रमांकाचा मान पटकवला आहे.

एमपीएससीचे टॉपर्स

  • रोहितकुमार राजपूत - प्रथम
  • सुधीर पाटील - दुसरा
  • सोपन टोपे - तिसरा
  • अजयकुमार नष्टे - चौथा
  • दत्तू शेवाळे - पाचवा
पुढील बातमी
इतर बातम्या