मुंबईतल्या पहिली ते आठवीच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद

(Representational Image)
(Representational Image)

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या पहिली ते आठवीच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने जारी केला आहे. या कालावधीत या इयत्तांचे शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू राहणार आहे.

मुंबईचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी ही घोषणा केली.

देशभरात कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. राज्यात अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.

मुंबईत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या