नववीची फेर परीक्षा सरसकट नाही

ज्या विद्यार्थ्यांना काही कारणास्तव नववीची परीक्षा देता आली नाही अशा विद्यार्थ्यांची नववीची पेरपरीक्षा होईल. सरसकट सर्व नववी नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेतली जाणार नसल्याची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयातून देण्यात आली आहे.

मेच्या पहिल्या आठवड्यात नववीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. राज्यभरात दरवर्षी दीड लाखांहून अधिक विद्यार्थी नापास होतात. यात जे विद्यार्थी काही कारणास्तव परीक्षा देऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांचाच फेरपरीक्षेसाठी विचार केला जाणार असल्याचे आदेश शाळांना देण्यात आले आहेत. 2016 मध्ये सहामही परीक्षा दिलेले, ४५ टक्के गुण प्राप्त केलेले अशा विद्यार्थ्यांची पहाणी करून फेरपरीक्षेचा निर्णय घेण्यात येईल असेही उपसंचालकांनी म्हटलं आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या