'आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली' उत्साहात साजरा

  • योगेश राऊत & मुंबई लाइव्ह टीम
  • शिक्षण

कांदिवली -'आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली'च्या 205 वा कार्यक्रम रविवारी झाला. वयाच्या 85 व्या वर्षी 'डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची वृत्तपत्रे व नियतकालिकांतील लेखांचा सामाजिक व वाङमयीन अभ्यास' विषयावर 'पीअेचडी' पदवी संपादन करणारे सामाजिक-शैक्षणिक जाणकार डाॅ. प्रकाश बंद्रे आणि ५ वी ते १० वी पर्यतच्या मराठी पाठ्यपुस्तकांचा चिकित्सक अभ्यास' विषयावर 'पीअेचडी' पदवी संपादन करणाऱ्या  प्रयोगशील शिक्षिका डाॅ. पूजा संखे यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.

या वेळी उपस्थित सभासदांनी मनमोकळ्या गप्पांच्या स्वरुपात अनेक सामाजिक-सार्वजनिक-शैक्षणिक मुद्द्यांवर थेट आणि सखोल चर्चा केली. या चर्चेला एकवीरा विद्यालयाचे मुख्याध्यापक कागीनकर, ज्येष्ठ नागरिक संघ, बोरीवली (पूर्व) च्या माजी कार्यवाह दिघे, अंधेरीवासी ज्येष्ठ नागरिक श्राॅफ यांच्यासह सर्व उपस्थितीतांनी चर्चेत सहभाग नोंदवला.

पुढील बातमी
इतर बातम्या