मनोहर कोतवाल शाळेविरोधात बालहक्क आयोगाकडे तक्रार

विक्रोळी - मनोहर कोतवाल ट्रस्ट संचालित माध्यमिक विद्यालय शाळेच्या मुजोरीविरोधात अखेर पालकांनी बालहक्क आयोगाकडे धाव घेतली आहे. फी न भरण्याऱ्या मुलांना जमिनीवर बसवण्यासह मुलांना डांबून ठेवले जात असल्याची तक्रार पालकांनी सोमवारी दाखल केली आहे. तर या तक्रारीची दखल घेत शाळेविरोधात योग्य ती कारवाई करण्याची मागणी आयोगाकडे करण्यात आल्याची माहिती पालक राधिका सागवेकर यांनी दिली आहे.

‌मुंबई लाइव्हने गेल्याच आठवड्यात शाळेच्या मुजोरीचा पर्दाफाश केला होता. याची दखल शिक्षण विभागाने घेतली असून शिक्षण निरीक्षकांना या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही या प्रकरणाची दखल घेत शिक्षण उपसंचालकांकडून अहवाल मागितला आहे. न्यायासाठी पालक आणि विद्यार्थी लढत आहेत. त्याचाच भाग म्हणून आता पालकांनी बालहक्क आयोगाकडे शाळेची तक्रार केली आहे. आता आयोग या प्रकरणी काय कारवाई करते याकडेच पालक आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या