आता अभ्यास करा व्हॉट्स अॅपवर!

गेल्या काही दिवसांपासून सातवीच्या गणित आणि विज्ञानाचे पुस्तक व्हॉट्स अॅपवर फिरत आहे. येत्या शैक्षणिक वर्षांपासून सातवी आणि नववीचा अभ्यासक्रम बदलणार आहे. त्यामुळे व्हॉट्स अॅपवर फिरणारे पुस्तक बदलेल्या अभ्यासक्रमानुसार आहे का? याबाबत पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

मात्र व्हॉट्स अॅपवर फिरणारी पुस्तके ही बदलेल्या अभ्यासक्रमानुसारच असल्याचे बालभारती मंडळाने स्पष्ट केले आहे.

पालकांनी चिंता करण्याचे करण नाही. सातवीची गणित, विज्ञान, नागरिकशास्त्र या विषयांची पुस्तके छापून तयार आहेत. त्या पुस्तकांची पीडीएफ बालभारतीच्या संकेतस्थळावर आहेत. ज्या अभ्यासक्रमाची पुस्तके छापून होतील त्याप्रमाणे ती पुस्तके संकेतस्थळावर टाकू

सुनील मगर, संचालक, बालभारती

त्यामुळे आता लवकरच विद्यार्थ्यांना सर्व इयत्तांची पुस्तके बालभारतीच्या संकेतस्थळावर मिळतील.

पुढील बातमी
इतर बातम्या