परीक्षा आल्या आता अभ्यासाला लागा!

  • भूषण शिंदे & मुंबई लाइव्ह टीम
  • शिक्षण

मुलुंड - दहावीच्या परीक्षा तोंडावर आल्याने विद्यार्थ्यांची चांगलीच लगबग सुरु आहे. याच परीक्षांचा विद्यार्थ्यांवर ताण पडू नये यासाठी गुरुवारी मुलुंड मधील व्ही.पी.एम विद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होते. 'अभिजित चव्हाण प्रतिष्ठान' मार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परीक्षेसाठी नेमकी काय तयारी करायची? कमीत कमी वेळात योग्य अभ्यास कसा करायचा? अशा अनेक गोष्टी विद्यार्थ्यांना सांगण्यात आल्या. पुस्तकाबाहेरचा एकही प्रश्न येणार नाही तेव्हा वायफळ काळजी कशाला? असं विद्यार्थ्यांना समजावण्यात आलं. 'सध्याच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे आणि म्हणूनच हा उपक्रम राबवण्यात आलाय' अशी माहिती अभिजित चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजित चव्हाण यांनी दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या