मुंबईतील एका खासगी कॉलेजमधील विद्यार्थिनींना हिजाब बंदी घालण्यात आली होती. महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना नकाब, बुरखा आणि हिजाब घालून महाविद्यालयात प्रवेश दिला जाणार नाही, असं प्रशासनाने म्हटलं होतं. महाविद्यालयाच्या या निर्णयाविरोधात 9 विद्यार्थिनींनी याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी झाली.
सर्वोच्च न्यायालायाने कोणी कपाळावर टिळा लावला म्हणून कॅालेजमध्ये प्रवेश नाकारता येतो का ? असा सवाल महाविद्यालयांना केला आहे. तसंच हिजाब, निकाब, बुरखा, टोपी घालण्यावर बंदी घालणाऱ्या परिपत्रकाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
मुंबईतले दोन महाविद्यायांनी परिपत्रक काढत हिजाब परिधान करून कॉलेजला येण्यास बंदी घातली होती, त्याला आज न्यायालयाने स्थगिती दिली. 9 मुलींनी सर्वोच्च न्यायालयात मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दाद मागीतली होती. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता, अशी माहिती सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांनी दिली आहे.
हेही वाचा