पालिका : १५ जानेवारीपर्यंत शाळा राहणार बंद

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव (Corona pedemic) यामुळे गेल्या ८ महिन्यांपासून (Lockdown)  शाळा (Schools) बंदच आहेत. कोरोना लॉकडाऊनचे निर्बंध (Unlock) हटवल्यानंतर देशातील कोरोना रुग्णांची (Corona Patients) संख्याही कमी होताना दिसली. यामुळे पुन्हा एकदा शाळा सुरू होतील अशी चर्चा होती. पण ब्रिटनमध्ये (Britain) उद्भवलेला नवीन कोरोना विषाणूचा प्रसार (new Corona virus) वेगात होताना दिसत आहे.

शाळा सुरू करायच्या की नाहीत? याबाबत राज्य सरकारनं (State government) आपली भूमिका स्पष्ट केली नाही. पण पालिकेनं याबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुंबई महानगर पालिकेनं १५ जानेवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातलं पत्र त्यांनी आयुक्तांना लिहीलं आहे.

कोरोना विषाणूचा नवीन स्ट्रेन आणि नवीन वर्ष या दोन कारणांमुळे कोरोना प्रादुर्भावाचा वाढता धोका लक्षात घेत शाळा उघडण्यासाठी आणखी विलंब होणार आहे. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थांची गर्दी होऊ शकते. त्यामुळे त्यांना कोरोना विषाणूची लागण होण्याचा धोका अधिक आहे.

यासंदर्भातच मुंबई महानगर पालिकेच्या शिक्षण विभागानं आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. तसंच १५ जानेवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याची मागणी या पत्रात केली आहे.

यापूर्वी ३१ डिसेंबरपर्यत शाळा बंद राहणार असा निर्णय घेण्यात आला होता. पण सध्याची परिस्थिती पाहता शाळा बंद ठेवण्याचा निर्णय बदलण्यात आला. पण यासर्वात विद्यार्थ्यांचं भवितव्य मात्र टांगणीला लागलं आहे.  


हेही वाचा

अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी जाहीर

मुंबई विठ्यापीठात ५४ महाविद्यालयांचा समावेश

पुढील बातमी
इतर बातम्या