सिनेट सदस्यांनी घेतली कुलगुरूंची भेट

  • मुंबई लाइव्ह टीम & संचिता ठोसर
  • शिक्षण

मुंबई विद्यापीठाचा विस्कळीत कारभार, परीक्षा विभागातील गोंधळ, विद्यापीठाचे नॅक रँकिंग आणि ढासाळलेली प्रतिमा आता मुंबई विद्यापीठाचे नवे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर पूर्वपदावर आणतील, अशी अपेक्षा युवासेनेच्या सिनेट सदस्यांनी कुलगुरूंकडे व्यक्त केली आहे. कुलगुरूपदी निवड झालेल्या डॉ. सुहास पेडणेकर यांचं अभिनंदन करण्यासाठी बुधवारी सिनेट सदस्यांनी कुलगुरूंची भेट घेतली.

विद्यापीठातील विविध सुधारणांची यादी

कुलगुरूंच्या भेटीदरम्यान सिनेट सदस्यांनी कुलगुरूंसमोर विद्यापीठातील विविध सुधारणांची यादी सादर केली. याशिवाय 'विद्यार्थ्यांचे रखडलेले आणि यावर्षीच्या विद्यार्थ्यांचं निकाल वेळेत लावून त्यांचं पदवी प्रमाणपत्र वेळेच्यावेळी द्या', अशी मागणीही युवासेनेच्या सिनेट सदस्यांकडून करण्यात आली.

विद्यार्थ्यांसाठी हेल्प डेस्क निर्माण करा

'लवकरात लवकर परीक्षा भवनाच्या तळमजल्यावर विद्यार्थ्यांसाठी हेल्प डेस्क निर्माण करावा, परीक्षकांना ठराविक मॉडेल सॉल्युशन द्या', अशीही मागणी यावेळी करण्यात आली. उपकेंद्रामध्ये पदवी प्रमाणपत्र, पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज, निकालपत्र, पात्रता आणि स्थलांतर प्रमाणपत्र, यांसारख्या विविध सोयीही विद्यार्थ्याकरता उपलब्ध करून द्याव्यात, असंही यावेळी सांगण्यात आलं.


हेही वाचा - 

सिनेट निवडणुकीत युवासेनेच्या दुर्गेचा अर्ज बाद, मनसेच्या सुधाकर तांबोळीची माघार

विद्यापीठाचे हंगामी कर्मचारी आक्रमक, अतिरिक्त काम न करण्यावर ठाम

पुढील बातमी
इतर बातम्या