दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत रिक्षा प्रवास

  • भूषण शिंदे & मुंबई लाइव्ह टीम
  • शिक्षण

भांडुप - 'उत्साही मित्र मंडळ'तर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी भांडुपमध्ये एक अनोखा उपक्रम हाती घेण्यात आलाय. परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी मोफत रिक्षासेवा पुरवली जात आहे. मंगळवारी दहावीचा पहिला पेपर असल्याने याच मुहूर्तावर शिवसेनेचे आमदार अशोक पाटील यांच्याहस्ते या उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. भांडुपच्या उत्कर्षनगरमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कालीमाता मंदिर ते परीक्षा केंद्र अशी सेवा पुरवली जाणार आहे. ही रिक्षासेवा परीक्षा संपेपर्यंत सुरू राहणार आहे. 'उत्साही मित्र मंडळ' हे 1977 पासून कार्यरत असून भरत गावडे हे मंडळाचे अध्यक्ष आहेत. सचिव विकास पाटील तसेच सहसचिव शिवाजी सावंत हे देखील या उद्घाटन सोहळ्यावेळी उपस्थित होते. अनेक सामाजिक कार्यात या मंडळाचे योगदान आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या