दक्षिण मुंबईतील कॉन्व्हेंट शाळांत डबेवाल्यांना बंदी

शाळेतील मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी शिक्षण विभागाने शाळेच्या कँटिनमधील जंक फूडवर बंदी घातली आहे. दुसरीकडे मात्र डबेवाल्यांना शाळेत येण्यावर दक्षिण मुंबईतील अनेक कॉन्व्हेंट शाळांनी बंदी घातली आहे. त्यामुळे मुलांनी नेमके खायचे काय असा प्रश्न पालकांना पडलाय?

हे देखील वाचा - शाळेच्या कँटीनमधून जंकफूड बाद

दक्षिण मुंबईतील अनेक शाळा या सकाळच्या सत्रात भरत असल्याने अनेकवेळा पालकांना सकाळी 7 वाजता मुलांना डबा करून देणे शक्य होत नाही. त्यामुळे पालकांनी डबेवाला हा पर्याय निवडला खरा, पण शाळेने डबेवाल्यांना शाळेत येण्यास मनाई केली आहे. त्याचप्रमाणे शिक्षण विभागाने कँटिनमध्ये मिळणाऱ्या पदार्थांवर बंदी आणली आहे. 

जर शाळेला मुलांनी पौष्टिक आणि घरचे खावे अस वाटत असेल तर त्यांनी डबेवाल्यांना शाळेत परवानगी दयावी. गेले अनेक वर्षांपासून शाळांमध्ये डबे पोहचवत आहोत. शाळेतील डबे बंद करून आमच्या पोटावर पाय आणला जात आहे. याबाबत शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे रितसर तक्रार करणार आहोत.

- सुभाष तळेकर, प्रवक्ता, मुंबई डबेवाला असोसिएशन

पुढील बातमी
इतर बातम्या