अकरावीसाठी विशेष समुपदेशन फेरी, अद्याप ७२ हजार जागा रिक्त

अकरावी प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाऊ नये, यासाठी समुपदेशन फेरी राबवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाद्वारे घेण्यात आला आहे. प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांचं कारण योग्य असल्यास या विद्यार्थ्यांना अकरावीसाठी प्रवेश मिळणार आहे.

इतक्या जागा रिक्त

मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील ८१० कॉलेजांत तब्बल ३ लाख ४ हजार ५० जागा रिक्त असून या जागांवर प्रवेश नियंत्रण समितीकडून पार पडलेल्या तब्बल अकरा फेऱ्यांत १ लाख ६७ हजार ४१४ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. त्यानंतर इनहाउस, अल्पसंख्याक आणि व्यवस्थापन कोट्यातून ६३ हजार ७६८ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असून एकूण २ लाख ३१ हजार १८१ प्रवेश झाले आहेत. या सर्व प्रवेशानंतर तब्बल ७२ हजार रिक्त जागा असून या जागांवर आणखी एक विशेष फेरी घेण्यात येणार आहे.

समुपदेशनातून ऑनलाइन प्रवेश

या फेरीत समुपदेशनातून ऑनलाइन प्रवेश देण्यात येणार असून यापूर्वी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचा यात समावेश न करता केवळ गरज असलेल्या विद्यार्थ्यांनाच या फेरीतून प्रवेश दिले जाणार आहेत. प्रवेश देताना विद्यार्थ्यांचे अर्ज मागवून योग्य कारण देणाऱ्या विद्यार्थ्यांचा या फेरीत समावेश केला जाणार आहे. यासंदर्भात अंतिम निर्णय १२ नोव्हेंबर म्हणजे सोमवारी घेतला जाणार असल्याची शक्यता आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या