मे महिन्याच्या सुट्ट्या संपल्यानंतर गुरुवारपासून शाळा सुरू झाल्या आहेत. चेहर्यावर दिसणारे कुतुहल आणि मनात असणारी भिती...असे वातावरण गुरुवारी प्रत्येक शाळेच्या गेटवर होते. पहिल्या दिवशी मुलांना शाळेत सोडताना पालकांच्या मनातही हुरहूर होती. हे वातावरण मुंबईतील सगळ्याच शाळांमध्ये होते.
राज्यभरात एकूण 1 लाख 3 हजार 685 शाळा आहेत. त्यापैकी 21 हजार 261 अनुदानित, तर 13 हजार 988 विनाअनुदानित शाळा आहेत.