विद्यार्थ्यांनो, तुमचा कल कुठंय?

  • मुंबई लाइव्ह टीम & सीमा महांगडे
  • शिक्षण

दहावी म्हणजे शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचं वळण. कारण त्यानंतरच विद्यार्थ्यांना कोणत्या शाखेतून आपलं करिअर घडवायचं हे ठरवता येतं. विद्यार्थ्यांचा नेमका कल कुठंय आणि कोणत्या क्षेत्रात त्यांना जास्त रुची आहे, याचं मूल्यपमापन करण्यासाठी शासनाकडून ही कलमापन चाचणी सुरू करण्यात आली आहे. शिक्षण मंडळाची यंदाची कल चाचणी १० फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी दिली आहे.

९ विभागीय मंडळातून १७ लाख विद्यार्थी

यंदा या कल चाचणीला शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळातून सुमारे १७ लाख ७५ हजाराहून अधिक विद्यार्थी बसणार आहेत. मागील वर्षी झालेल्या कल चाचणीला २१ हजार ६८६ शाळांमधील एकूण १७ लाख ६५ हजाराहून अधिक विद्यार्थी बसले होते. या कल चाचणीचा निकाल ऑनलाईन जाहीर होणार असला तरी त्याची माहिती विद्यार्थ्यांना दहावीच्या गुणपत्रिकेसोबतच दिली जाणार आहे.

परीक्षा कधी?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून ही कल चाचणी घेण्यात येत असली तरी यंदाही या परीक्षेचा अभ्यासक्रम मात्र खासगी कंपनीचाच असणार आहे. १० ते २८ फेब्रुवारीदरम्यान दहावीच्या विद्यार्थ्यांच्या तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा होत असून याच दरम्यान कल चाचणी त्या-त्या शाळांमध्ये गटागटाने घेतली जाणार असल्याची माहिती परिपत्रकातून देण्यात आली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या