विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात

  • योगेश राऊत & मुंबई लाइव्ह टीम
  • शिक्षण

कांदिवली - भाब्रेकरनगर इथल्या श्रीमती सरोजादेवी आदर्श विद्यालय हिंदी माध्यमिक शाळेतील मुलांचं भवितव्य टागंणीला लागलंय. या शाळेत जवळपास 800 विद्यार्थी शिकतात. 2009 ला शालेय खात्याने शाळेला मान्यता दिली. मात्र आता ही शाळा एसआरएच्या अपात्र पात्रतेच्या कक्षेत अडकली आहे. त्यामुळे कोर्टाच्या आदेशानुसार प्रशासनाने लगेचच शाळेच्या अपात्र इमारतीवर तोडक कारवाई केली. विद्यार्थ्यांची कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता ही शाळा पाडण्यात आली. शाळेतील सामान उद्धस्त करण्यात आलं. त्यामुळे सध्या शाळेचे वर्ग शाळेच्या आवारातील मंदिरातील मोकळ्या जागेत भरत आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या