एच.एस.सी. बोर्ड परिक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक

  • भारती बारस्कर & मुंबई लाइव्ह टीम
  • शिक्षण

मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळ, वाशी येथे बुधवारी शिक्षक भारती ज्युनिअर कॉलेज मुंबई युनिट यांची फेब्रु, मार्च 2017 एच.एस.सी. परीक्षेसंदर्भात सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीकोणातून विभागीय सचिव सिद्धेश्वर चांदेकर यांनी सात मुद्दे मान्य केले. यावेळी प्रा. आर बी पाटील, प्रा. सुरेश कोकितकर, ज्युनि. कॉलेज युनिट अध्यक्ष प्रा. शरद गिरमकर, प्रा. इश्वर आव्हाड, प्रा. पंकज देसले, प्रा. जी. टी. पाटील, प्रा. प्रमोद बुगड, उपसचिव डॉ. सुभाष बोरसे आणि सर्व ज्युनिअर कॉलेज शिक्षक भारतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

मान्य करण्यात आलेले मुद्दे पुढील प्रमाणे -

  • पेपर तपासणीच्या मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव राज्य मंडळाकडे पाठविण्यात येईल. आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न केले जातील.

  • परीक्षक आणि नियामक यांना यापुढे नोटीस दिली जाणार नाही. अपवादात्मक परिस्थितीत गंभीर चूक असेल तरच सदर व्यक्तीस व्यक्तिशः बोलावून चर्चा केली जाईल आणि सदर माहिती गोपनीय ठेवली जाईल. परिणामी शिक्षकाची नाहक बदनामी टळेल.

  • शिक्षक भारती संघटनेने विद्यार्थ्यांना हॉल तिकीट ऑनलाइन देण्याची मागणी केली. याबाबत भविष्यात लवकरच अंमलबजावणी करण्याचे मान्य केले.

  • बारावी मार्कशीट आणि प्रमाणपत्रावर विद्यार्थ्यांचा फोटो आणि निकाल पाहण्यासाठी Result App बाबत केलेल्या मागणीचा विभागीय सचिव सिद्धेश्वर चांदेकर यांनी Constructive सूचना असा उल्लेख केला आणि सदर सूचनेची राज्य मंडळामार्फत अंमलबजावणी करण्याचे मान्य केले.

  • OMR sheet मध्ये गुण भरताना चूक झाल्यास 100 रुपये दंडाचा संघटनेने तीव्र विरोध केला आणि सदर परिपत्रक मागे घेण्यास सांगितले. सचिवांनी राज्य मंडळास तात्काळ कळविण्याचे मान्य केले.

  • परीक्षक आणि नियामक यांना अनुक्रमे 250 व 1500 पेपर assessment साठी दिले जातील.

  • रात्र ज्युनिअर कॉलेजमधील शिक्षकांना पेपर तपासणीच्या कामातून वगळण्यात येईल.

पुढील बातमी
इतर बातम्या