चर्चकडून गरीब मुलांच्या शिक्षणाचा खर्च

  • शिवशंकर तिवारी & मुंबई लाइव्ह टीम
  • शिक्षण

बोरिवली - आईसी कॉलोनी आवर लेडी ऑफ इम्माकुलेट कॉन्सेप्शन चर्च गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलते. हे चर्च 1547 मध्ये उभारण्यात आलं होतं. फादर मार्टिज यांनी या चर्चचा कार्यभार सांभाळला. फादर मार्टिज यांनी इथं सुरुवातीला अनाथ आश्रम सुरू केलं. त्यानंतर शाळा आणि कॉलेज सुरू केलं. नर्सरी ते बारावीपर्यंत इथं मुलांना मोफत शिकवलं जातं. आईसी कॉलनी या नावानं हे चर्च प्रसिद्ध आहे. या चर्चमध्ये शिक्षण घेतलेली मुलं परदेशात नोकरीला देखील लागली आहेत. या चर्चच्या माध्यमातून गरीब मुलांच्या शिक्षणाला हातभार लागला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या