यूपीएससीकडून २०२२ च्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) 2022 मध्ये होणाऱ्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यूपीएससीच्या सीडीएस, एनडीए, आयईएस, सीआयएसएफ सारख्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी upsc.gov.in ला भेट देऊन वेळापत्रक पाहावे लागणार आहे. 

2022 मधील परीक्षा 20 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. 2021 मध्येही काही परिक्षांचं नोटिफिकेशन जारी केले जाणार आहे. अभियांत्रिकी सेवा 2022, संयुक्त जीईओ सायंटिस्ट सारख्या परीक्षांचा त्यामध्ये समावेश असेल. या परीक्षांची अधिसूचना 22 सप्टेंबर रोजी जारी केली जाणार असून सीआयएससी परीक्षा 2022 चे वेळापत्रक 1 डिसेंबर रोजी जारी केलं जाईल.

परीक्षेच्या तारखा

- अभियांत्रिकी सेवा (प्रारंभिक) परीक्षा 2022 / एकत्रित भू-शास्त्रज्ञ (प्राथमिक) परीक्षा 2022: 20 फेब्रुवारी 2022

- CISF AC (EXE) LDCE-2022: 13 मार्च 2022

- NDA आणि NA परीक्षा (I), 2022/ CDS परीक्षा (I), 2022: 4 एप्रिल 2022

-नागरी सेवा (प्रारंभिक) परीक्षा, 2022 / भारतीय वन सेवा (प्रारंभिक) परीक्षा, 2022, CS (P) परीक्षा 2022: 5 जून 2022

- IES/ISS परीक्षा, 2022: 24 जून 2022

- एकत्रित भू-वैज्ञानिक (पुरुष) परीक्षा, 2022: 25 जून 2022

- अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा, 2022: 26 जून 2022

- एकत्रित वैद्यकीय सेवा परीक्षा, 2022: 17 जुलै 2022

- केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (ACs) परीक्षा 2022: 7 ऑगस्ट 2022

- NDA आणि NA परीक्षा (II), 2022 / CDS परीक्षा (II), 2022: 4 सप्टेंबर 2022

- नागरी सेवा (मुख्य) परीक्षा 2022: 16 सप्टेंबर 2022

- भारतीय वन सेवा (मुख्य) परीक्षा 2022: 20 नोव्हेंबर 2022

- SO/स्टेनो (GD-B/GD-I) LDCE: 10 डिसेंबर 2022

- UPSC RT/परीक्षा: 18 डिसेंबर 2022

पुढील बातमी
इतर बातम्या