एसएनडीटी विद्यापीठाबाहेर विद्यार्थिनींचे 'शॉर्ट्स' आंदोलन

  • संतोष मोरे & मुंबई लाइव्ह टीम
  • शिक्षण

चर्चगेट - एसएनडीटी विद्यापीठाने मुलींच्या पेहरावावर सक्ती केल्याच्या विरोधात शुक्रवारी विद्यार्थी भारतीच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठाबाहेर शॉर्ट्स घालून आंदोलन केलं. या वेळी विद्यापीठाबाहेर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्तही ठेवला होता.

संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी शॉर्ट्स घालून महिला विद्यापीठाबाहेर निषेध नोंदवत मुर्दाबादच्या घोषणाही दिल्या. दरम्यान पोलिसांनी विदयार्थी भारतीच्या आंदोलनकर्त्यांमधील 12 मुलींना आणि 7 मुलांना ताब्यात घेतले. एसएनडीटी विद्यापीठाने जर लवकरात लवकर याबद्दल कळवले नाही तर यापुढे आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा विद्यापीठ अध्यक्षा ज्योती निकाळजे यांनी दिला.

पुढील बातमी
इतर बातम्या