अस्मिता शाळेत माजी विद्यार्थ्यांचा बालदिन

  • कल्याणी उमरोटकर & मुंबई लाइव्ह टीम
  • शिक्षण

जोगेश्वरी - शालेय शिक्षण पूर्ण झालं, तरी शाळेसोबतचं नातं टिकुन रहावं यासाठी जोगेश्वरी पूर्व येथील अस्मिता शाळेनं माजी विद्यार्थांची संघटना स्थापन केली. तसंच दरवर्षी अस्मिता शाळेकडून दिवाळी सुट्टी संपन्न झाल्यावर पहिल्याच दिवशी माजी विद्यार्थी-शिक्षक दिन आयोजित करण्यात येतो. या वर्षी 15 नोव्हेंबरला हा कार्यक्रम होणार आहे. असा उपक्रम आयोजित करणारी जोगेश्वरीतील ही एकमेव शाळा आहे. माजी विद्यार्थी या दिवशी शाळेत येऊन शिक्षकाची भूमिका बजावतात. ५ वी ते ९वी च्या विद्यार्थांना प्रशिक्षण देतात. त्यांच्या कार्यक्षेत्रातले अनुभव मुलांना सांगतात. १९९७पासून ते अगदी २०१६पर्यंतचे माजी विद्यार्थी या सोहळ्यात सहभागी होतील, असं मुख्याधापक कैलास पाटील यांनी अभिमानानं सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या