महिला वस्तीगृह लवकरच सुरू होणार

  • संतोष मोरे & मुंबई लाइव्ह टीम
  • शिक्षण

नरिमन पॉइंट - मुंबई विदयापीठानं नरिमन पॉइंटला बांधलेल्या महिला वसतीगृहाचं काम डिसेंबरअखेर पूर्ण होणार आहे. तशा सूचना उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री रविंद्र वायकर यांनी बुधवारी विद्यापीठ प्रशासनाला दिल्या. या वसतीगृहात 150 विदयार्थीनींची राहण्याची व्यवस्था असेल. विदयापीठात मुलींसाठी तीन वसतीगृहं असून नरिमन पॉंइंटचं वसतीगृह लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी आहे. वसतीगृहाचं बांधकाम 75 टक्के पूर्ण झालं आहे. फर्निचरचं काम सुरू आहे. जर वीजजोडणी लवकर झाली, तर एक-दोन महिन्यांत वसतीगृह वापरण्यास सुरुवात करता येईल, असं विदयापीठाचे कुलसचिव डॉ. अहमद खान म्हणाले. या वेळी कुलगुरू डॉ. संजय देशमुख, कुलसचिव डॉ. अहमद खान, युवा सेनेचे प्रदीप सावंत, महादेव जगताप, राजन कोळंबकर आदीही उपस्थित होते.

पुढील बातमी
इतर बातम्या