अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी मुख्याध्यापकांची शाळा

  • मुंबई लाइव्ह टीम & नम्रता पाटील
  • शिक्षण

 सकाळी १०.०० ते दुपारी २.०० - दहावीची परीक्षा संपली की विद्यार्थी, पालक आणि महाविद्यालयांची घाई होते ती अकरावीच्या प्रवेशासाठी. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मुंबईत अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या प्रवेशप्रक्रियेत कोणतीही गडबड किंवा गोंधळ होऊ नये म्हणून शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून येत्या २५ ते २७ एप्रिल २०१८ रोजी या मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यशाळेसाठी सर्व माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांचा गोंधळ थांबवण्यासाठी...

अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत बऱ्याच वेळा पालक आणि विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो. यामुळे विद्यार्थी आणि पालकांच्या मार्गदर्शनपर सभा घेऊन मुख्याध्यापकांनी ऑनलाईन प्रक्रियेबाबत योग्य मार्गदर्शन करावे. या संपूर्ण प्रक्रियेचा प्रचार आणि प्रसार व्हावा, याची जबाबदारी माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची असते. यासर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांना ऑनलाईन प्रक्रियेची माहिती असणे गरजेचं आहे. त्यामुळेच या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं असून ११ वी ऑनलाइन प्रवेश प्रकियेदरम्यान विद्यार्थ्यांचा गोंधळ थांबवण्यासाठी शिक्षण विभागानं हे ठोस पाऊल उचललं अाहे.

ऑनलाईन प्रवेशपुस्तिकेतही बदल

यावर्षी ११वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत बरेचसे बदल करण्यात आले आहे. बायफोकल शाखांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी विशेष फेरी राबवण्यात येणार आहे. ऑनलाईन माहिती पुस्तकातही बदल करण्यात आला असून यावर्षीपासून कॉलेजच्या नावांची यादी या पुस्तकात प्रसिद्ध होणार नसल्याची माहिती उपसंचालक विभागाकडून देण्यात आली आहे.

येथे होणार कार्यशाळा

विभाग

दिनांक

वेळ

ठिकाण

 दक्षिण मुंबई

२५ एप्रिल १८

 स. १० ते दु. २

के. सी कनिष्ठ महाविद्यालय, चर्चगेट

उत्तर मुंबई

२५ एप्रिल १८

स. १० ते दु. २स्वामी मुक्तानंद हायस्कूल, चेंबूर

पश्चिम मुंबई

२५ एप्रिल १८

स. १० ते दु २

एस. व्ही. पी. व्ही हायस्कूल आणि टी. पी. भाटीया कनिष्ठ महाविद्यालय, कांदिवली (प)

नवी मुंबई मनपा क्षेत्र

 २६ एप्रिल १८

 स. १० ते दु. २

कर्मवीर भाऊराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय, सेक्टर १५ ए , वाशी

 पनवेल

२६ एप्रिल १८

स. १० ते दु. २कर्मवीर भाऊराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय, सेक्टर १५ ए , वाशी

ठाणे मनपा क्षेत्र

२६ एप्रिल १८

 स. १० ते दु. २

शेठ हिराचंद मुथा कनिष्ठ महाविद्यालय, आधारवाडी जेल रोड, कल्याण (प)

कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्र

२६ एप्रिल १८

स. १० ते दु. २

शेठ हिराचंद मुथा कनिष्ठ महाविद्यालय, आधारवाडी जेल रोड, कल्याण (प)

मिरा भाईंदर मनपा क्षेत्र

२६ एप्रिल १८

 स. १० ते दु. २

 अस्मिता कॉलेज ऑफ आर्टस व कॉमर्स, अस्मिता कॅम्पस, मिरा रोड (पूर्व)

उल्हासनगर मनपा क्षेत्र

२७ एप्रिल १८

स. १० ते दु. २

आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कुळगाव बदलापूर (पूर्व)

अंबरनाथ व बदलापूर नगरपालिका

२७ एप्रिल १८

स. १० ते दु. २

आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कुळगाव बदलापूर (पूर्व)

 

पुढील बातमी
इतर बातम्या