व्हॉटस् अपवर व्हायरल झालेल्या त्या निकालाच्या तारखा चुकीच्या

गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियाचा वापर इतका वाढलाय कि, तुमच्यापर्यंत कुठलीही माहिती एका क्षणात पोहचू शकते. मात्र कधी कधी याच सोशल मीडियाच्या माध्यामातून आलेल्या मेसेजमुळे अनेकदा अनेकांचे गोंधळ उडालेत. सध्या बोर्डाला असाच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मेसेजचा त्रास सहन करावा लागत आहे. 

सध्या व्हॉटस् अपवर चक्क 10 वी आणि 12 वी च्या निकालाच्या तारखा व्हायरल होत आहेत. मार्च आणि एप्रिलमध्ये 10वी आणि 12 वीच्या परीक्षा पार पडल्या. त्यानंतर निकालाच्या खोट्या तारखा व्हॉटस् अपवर फिरू लागल्या. मात्र व्हॉटस् अपवर फिरणाऱ्या या तारखा खोट्या असल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे. अद्याप 10 वी आणि 12 वीच्या निकालाच्या तारखाच जाहीर झाल्या नसल्याचे  बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. 

याआधी व्हॉटस् अपवर 12 वी आणि 8 वी च्या परीक्षेचा पेपर वॉटस्अपवर व्हायरल झाला होता. 12 वीची परीक्षा सुरू होण्यापूर्वी काही मिनीटे आधी पेपर व्हॉटस् अपवर फिरत होता. या प्रकरणात दोन मुलांना अटकही करण्यात आली होती. बोर्डाच्या उत्तरपत्रिका विलेपार्लेच्या एका हॉटेलमध्ये तपासतानाचा एक व्हीडिओ युवा सेनेने नुकताच प्रसिद्ध केला होता. 

पुढील बातमी
इतर बातम्या