"मुंबई विद्यापीठातंर्गत येणाऱ्या महाविद्यालयांची नामफलक मराठीत करा"

मुंबई विद्यापीठ (Mumbai University) आणि त्याअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांचे नामफलक मराठीत (Marathi Language) करा, अशी मागणी युवासेनेनं (Yuvasena) विद्यापीठ प्रशासनाकडे केली आहे.

मायमराठीचं संवर्धन, प्रचार आणि प्रसार होण्यासाठी युवासेनेनं या मागण्या केल्या आहेत. विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय अधिसभेमध्ये युवासेनेनं स्थगन प्रस्ताव मांडून या मागण्या केल्या आहेत.

यासाठी विद्यापिठाच्या अर्थसंकल्पीय अधिसभेमध्ये युवा सेनेकडून स्थगन प्रस्ताव मांडून काही महत्त्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या आहेत. युवासेना सिनेट सदस्य शीतल देवरुखकर शेठ यांनी हा स्थगन प्रस्ताव मांडला आहे.

या संदर्भात तातडीनं परिपत्रक काढून महाविद्यालयांची नाम फलक मराठीत करण्यात यावेत, अशा प्रकारचा आग्रह केला जाणार असल्याचं युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी सांगितलं आहे.

काय आहे प्रस्तावातील मागण्या?

  • महाविद्यालयांच्या नावाचे फलक तसंच ईतर सुचना फलक मराठीमध्ये असावेत.
  • विद्यापीठ पातळीवर मराठीभाषा विकास मंडळाची स्थापना करावी व त्याला उचित अर्थ सहाय्य देण्यात यावे.
  • प्रत्येक महाविद्यालयात मराठी वांड्मय मंडाळाची स्थापना अनिवार्य करुन मंडाळाच्या कार्यक्रमांसाठी आर्थिक तरतूद करावी.
  • मराठी ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथ दिंडी या सारखे उपक्रम राबावणे
  • महाविद्यालयांचे प्रवेश अर्ज, माहिती पुस्तिका, भित्ती पत्रके, प्रश्न पत्रिका इ. सर्व मराठी भाषेत उपलब्ध करण्यात यावे.
  • काही विषयांच्या परीक्षा मराठी माध्यमातून देण्याची सोय करावी.
  • मराठी भाषेतून PH.D करण्यासाठी प्रोत्साहनदायी उपाय योजना कराव्यात.
  • मराठी भाषेचा वापर वाढवण्यासाठी विद्यापिठ पातळीवर ठोस धोरण आखावे.

वरील मागण्या मान्य करुन लवकरच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्याच्या मोहिमेत सहभागी होण्याचे परीपत्रक आणि इतर परीपत्रकं काढण्याचे आश्वासन कुलगुरुंनी दिलं आहे.


हेही वाचा

मराठीच्या पुस्तकात इंग्रजी शब्दांचाही होणार वापर

Mumbai University: विद्यार्थ्यांच्या तक्रारी ऑनलाइन सोडवण्याचे आदेश

पुढील बातमी
इतर बातम्या