आयएनटीत चुरस, 20 कॉलेज उपांत्य फेरीत

  • संतोष मोरे & मुंबई लाइव्ह टीम
  • मनोरंजन

चर्चगेट – एकांकिका विश्वात मानाचा समजला जाणारा आयएनटी स्पर्धेचा प्राथमिक फेरीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. एकूण 20 कॉलेजेसनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. आता अंतिम फेरीत कोणते कॉलेज पोहचणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. यंदा एकूण 34 कॉलेजेसनी आयएनटी स्पर्धेत सहभाग घेतला होता. प्राथमिक फेरीनंतर आयएनटीची उपांत्य फेरी 4 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. या फेरीमधून निवडलेल्या अव्वल पाच अंतिम फेरीत दाखल होतील. अंतिम फेरी 8 ऑक्टोबरला यशंवतराव सेंटरमध्ये रंगणार आहे.

उपांत्य फेरीत दाखल झालेली महाविद्यालये

भाऊसाहेब वर्तक महाविद्यालय

शंकरनारायण महाविद्यालय

डॉ. आंबेडकर महाविद्यालय

महाड महाविद्यालय

रुईया महाविदयालय

आचार्य मराठे महाविद्यालय

बिर्ला महाविद्यालय

सिडनम महाविद्यालय

ज्ञानसाधना महाविद्यालय

वि. वा. महाविद्यालय

सी. एच. एम. महाविद्यालय

एस. के. सोमय्या

जोशी बेडेकर महाविद्यालय

खालसा महाविद्यालय

साठ्ये महाविद्यालय

एलफिन्स्टन महाविद्यालय

डहाणूकर महाविद्यालय

के. जे. सोमय्या महाविदयालय

पुढील बातमी
इतर बातम्या