'धडक'च्या आधीच इशानची हॉलिवूडमध्ये धडक

  • मुंबई लाइव्ह टीम & संचिता ठोसर
  • मनोरंजन

सध्या शाहीद कपूरचा छोटा भाऊ ईशान खत्तर आणि श्रीदेवीची कन्या जान्हवी कपूर या दोघांची जोरदार चर्चा सुरू आहे. हे दोघही 'धडक' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. आजपर्यंत धडक हा ईशानचा पहिलाच चित्रपट आहे, असा समज सगळ्यांचा होता. मात्र हा समज पुर्णत: चुकीचा ठरला आहे. कारण धडकच्या पूर्वीच ईशानने हॉलीवूड मुव्हीतून डेब्यू केला आहे. त्याच्या या पहिल्या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शितही झाला आहे.

माजिद मजिदी दिग्दर्शित 'बियॉण्ड द क्लाऊड्स'या चित्रपटात ईशान मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमधून ईशान एक उत्तम अभिनेता म्हणून समोर आला आहे. तरण आदर्शने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर 'बियॉण्ड द क्लाऊड्स'चा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. हा सिनेमा २३ मार्चला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. हिंदी, इंग्रजी आणि तमिळ अशा तिन्ही भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होईल.

Trailer link in bio.

A post shared by Ishaan Khatter (@ishaan95) on

काय आहे या चित्रपटात?

या चित्रपाट ईशानने धोबी घाटावरील एका मुलाची भूमिका साकारली आहे. ही कथा मुंबईत घडली असल्याचं ट्रेलरवरूनच कळतं. या चित्रपटात ईशानच्या बहिणीची भूमिका मल्ल्याळम अभिनेत्री मालविका मोहननने साकारली आहे. ईशानला या सिनेमासाठी टर्की येथील बोस्फोरूस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.

इशानेही त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याच्या या सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या