अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीची आत्महत्या

अभिनेत्री मयुरी देशमुख हिचा पती आशुतोष भाकरे (३२) याने बुधवारी राहत्या घरी नांदेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याच्या आत्महत्येमागचे नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, त्याने नैराश्येतून  आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

या घटनेमुळे आशुतोषच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. आशुतोषने काही दिवसांपूर्वी फेसबूकवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये त्याने माणूस आत्महत्या का करतो यावर विश्लेषण केलं होतं. मात्र तरीही आशुतोषने एवढा मोठा टोकाचा विचार केल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.  ११ ते १२ वाजण्याच्या सुमारास आशुतोषने आत्महत्या केली. 

लॉकडाउनमुळे आशुतोष आणि मयुरी हे नांदेडमधील घरी राहत होते. आशुतोष वरच्या खोलीमध्ये होता. बराच वेळ तो खाली न आल्याने घरातील सदस्य त्याला पाहण्यासाठी गेले असता त्याने गळफास लावून घेतल्याचं दिसून आलं. 

 आशुतोषने भाकर, इच्यार ठरला पक्का, या चित्रपटात काम केलं होतं. आशुतोष आणि मयुरी देशमुख २१ जानेवारी २०१६ रोजी लग्नबंधनात अडकले होते. ‘खुलता कळी खुलेना’मधून मयुरी घराघरात पोहचली. त्यानंतर तिने काही व्यवसायिक नाटकांमध्येही काम केलं. 

पुढील बातमी
इतर बातम्या