बिग बॉसच्या घरात येणार शर्मिष्ठा राऊत?

  • मुंबई लाइव्ह टीम & संचिता ठोसर
  • मनोरंजन

कलर्स मराठीवर मनोरंजनाचा तिसरा डोळा उघडला नाही की तोच बिग बॉस मराठी प्रेक्षकांचा आवडता कार्यक्रम झाला. सध्या मराठी प्रेक्षक केवळ मराठी बिग बॉसबद्दलच चर्चा करत असताना दिसतात. इथं दिसतं तसच असतं असं म्हणतं हा कार्यक्रम घराघरात पोहचला आणि कलाकारांचा खरा चेहरा प्रेक्षकांसमोर आला. बिग बॉस मराठीला एक महिना उलटल्यानंतर वाईल्डकार्ड घरात एन्ट्री घेतलेल्या हर्षदा खानविलकरला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली. आता लवकरच आणखी एक सदस्य बिग बॉसच्या घरात येणार आहे.

आता शर्मिष्ठाची एन्ट्री?

लवकरच अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतची बिग बॉसच्या घरात एन्ट्री होणार आहे, असं समजत आहे. याआधी शर्मिष्ठा उंच माझा झोका, जुळून येती रेशीमगाठी अशा अनेक मालिकांमध्ये तर योद्धा, चि. सौ. कां या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आली. उंच माझा झोका या मालिकेतील तिच्या अभिनयाने तिनं मराठी प्रेक्षकांमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं.

घरातील समिकरणं बदलणार?

याआधी हर्षदा बिग बॉसच्या घरात आली. त्यानंतर बिग बॉसच्या घरातील चित्रच बदललं. हर्षदाच्या एन्ट्रीनंतर राजेश आणि रेशमी जोडी विशेष चर्चेत आली, आणि त्यानंतर राजेशला घरातून बाहेर पडावं लागलं. आता शर्मिष्ठाच्या येण्याने घरातील समिकरणं बदलणार का? शर्मिष्ठा नवीन स्ट्रॅटेडी घेऊन घरात येणार का? हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या